मुंबई – सध्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Assembly Session) सुरु आहे. मात्र, आजचं कामकाज सुरु होण्याआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये (Oppositions) जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. हा वाद इतका वाढला कि नंतर विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये धक्काबुक्की करत आई-बहिणींवरून शिवीगाळ देखील करण्यात आली आहे. सध्या हा वादाचा व्हिडिओ (video) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पावसाळी अधिवेशन (Monsoon Assembly Session) सुरू झाल्यापासून विरोधी पक्षातील नेते विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून जोरदार आंदोलन करत आहेत.

’50 खोके, एकदम ओक्के’ यासारख्या घोषणा देऊन महाविकास आघाडीनं विधानसभा परिसर दणाणून सोडला आहे. यानंतर आज सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीदेखील याच ठिकाणी आंदोलन केलं आहे.

त्यांनी करोना काळात झालेल्या भ्रष्टाचारावरून महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे. यावेळी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले आणि एकच राडा झाला.

यावेळी प्रचंड गोधळाचं वातावरण निर्माण झालं. सत्ताधारी पक्षानेदेखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. लवासातील खोके एकदम ओके! अश्या घोषणा सत्ताधाऱ्यांनीही दिल्या.

दरम्यान, ही धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाल्यानंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी जीत पावरी यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली असल्याचे दिसून आले.

यावेळी अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “आम्ही सत्तेवर असतानाही विरोधीपक्ष विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. मात्र, आम्ही त्यांना कधी अडवलेले नाही. परंतु आज जाणीवपूर्वक हा प्रकार घडला.

महाराष्ट्रात ज्याप्रकारे आमच्या घोषणा दाखवल्या गेल्या, त्याने आपली प्रतिमा मलिन झाल्याची शंका त्यांना आली असावी, ‘चारोच्या मनात चांदणं’ असा हा प्रकार आहे’ अशी प्रतिक्रिया अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

यावेळी पवार पुढे म्हणाले. “अधिवेशनाचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. आम्ही महाविकास आघाडीचे आमदार रोज साडेदहा वाजता विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन करत असतो, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा इतर मागण्या असलतील. त्या विविध घोषणांद्वारे सरकारसमोर मांडत असतो. मात्र, त्यातील ‘पन्नास खोके एकदम ओक्के’ ही घोषणा त्यांना चांगलीच जिव्हारी लागली आहे. असं ते म्हणाले.