Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

बंजारा समाजाचा मोदी यांच्याकडून घोर अपमानःपटोले

2014 च्या निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता आल्यानंतर बंजारा समाजाला आदिवासींचे आरक्षण देतो, असं लेखी आश्वासन दिलं होतं; पण आजपर्यंत त्यांनी तो शब्द पाळला नाही.

बंजारा समाजाची फसवणूक करून समाजाच्या दैवतांचा मोदी यांनी घोर अपमान केला आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

बंजारा टायगर्सचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण

पटोले यांच्या उपस्थितीत टिळक भवन इथं राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्यात आलं.

बंजारा टायगर्स संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मदन जाधव यांच्यासह संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

या वेळी आ. राजेश राठोड, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, डॉ. राजू वाघमारे, आदी उपस्थित होते.

टायगर काँग्रेसमय

बंजारा टायगर फोर्सच्या सर्व पदाधिका-यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून पटोले म्हणाले, की स्व. वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांचे महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान राहिले आहे.

त्यांनी राज्यात ऊर्जा प्रकल्पांची निर्मिती करून राज्याला प्रकाशात आणले, वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हरितक्रांती झाली. बंजारा समाजाने राज्याला दिशा दाखवून दिली.

बंजारा समाज हा आत्मसन्मासाठी लढणारा, देशहितासाठी काम करणारा समाज आहे. राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटना आज काँग्रेसमध्ये विलीन झाली.

टायगरला इलाका नसतो आणि पंजा फक्त टायगरकडे असतो आणि आता टायगर (वाघ) काँग्रेसमय झाला आहे, असा मिश्किल टोला पटोले यांनी लगावला.

Leave a comment