Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

रेमडेसिव्हिरचा काळाबाजार; मोठे रॅकेट उद्ध्वस्त

पहिल्या आणि दुस-या लाटेत रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात झाला होता.

आता तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन ऑनलाईन पद्धतीनं रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार करून, लाखोंना गंडा घालणा-या टोळीचा मुंबई पोलिसानी पदार्फाश केला आहे.

बिहारपर्यंत धागेदोरे

ऑनलाईन पद्धतीने रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करुन देतो अशी बतावणी करुन लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी भंडाफोड केला आहे. या रॅकेटचे धागेदोर थेट बिहारपर्यंत जुळले आहेत.

16 जून रोजी एका व्यक्तीने ऑनलईन पद्धतीने रेमडेसिव्हिर इंजेक्शन मागवले होते; पण त्याला हे इंजेक्शन वेळेवर मिळाले नाही. ऑनलाईन पद्धतीने पैसे देऊनही इंजेक्शन न मिळाल्यामुळे या व्यक्तीने मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

याच तक्रारीच्या अनुषंगाने तपास करत पोलिसांनी या रॅकेटचा भंडाफोड केला. या प्रकरणी पोलिसांनी साठ लाख रुपये आणि शंभर सीमकार्ड जप्त केले आहेत. सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

काळ्या बाजारासाठी समाजमाध्यमांचा वापर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला. यामुळे आपल्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी लोक जमेल त्या मार्गाने रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळवण्याचा प्रयत्न करत होते.

अशा काळात सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या ऑर्डरसाठी संपर्क करा, असे मेसेजेस फिरत होते. याच मेसेजच्या जाळ्यात फसून एका व्यक्तीने रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी ऑनालईन पद्धतीने ऑर्डर दिली.

तसेच त्यासाठी ऑनलाईन पद्धतीनेच पैसेसुद्धा दिले; मात्र पैसे देऊनही इंजेक्शन न मिळाल्यामुळे त्या व्यक्तीने 16 जून रोजी पोलिसात रितसर तक्रार केली. हा प्रकार समोर आल्यानंतर अशा अनेक लोकांची फसवणूक झाल्याचा संशय पोलिसांना आला.

फसवणुकीसाठी प्रॉपर कॉल सेंटर

या प्रकरणातील आरोपींना ट्रेस करणं कठीण होतं; पण तरीही तांत्रिक बाबींच्या आधारे मुंबई सायबर पोलिसांची टीम थेट बिहारला पोहोचली.

तिथे पोहोचल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फसवेगिरी करण्यासाठी एक प्रॉपर कॉल सेंटर चालवलं जात असल्याचं पोलिसांना समजलं. त्यानंतर पोलिसांनी या कॉल सेंटरवर धाड टाकून 6 जणांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार या रॅकेटमध्ये पकडण्यात आलेले आरोपी हे सुशिक्षित आहेत. बी टेक, बीएस्सी आणि 12 वी सायन्स असे शिक्षण घेतलेले यातील काही आरोपी आहेत. यामध्ये एका अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे.

Leave a comment