कोरोनामुळे विद्यार्थ्यांना वर्गात जाऊन शिक्षण घेता आले नाही, तरीही त्यांना उत्तीर्ण करून पुढच्या वर्गात घालण्यात आले.

आता त्याच्या मागच्या इयत्तेचा इयत्तेचा अभ्यास नीट झाला आहे, की नाही, हे पाहण्यासाठी उजळणीचे स्वरूपाचा ‘ब्रिज कोर्स’ सुरू करण्यास मुहूर्त निघाला आहे.

सेतू अभ्यासक्रम तयार
शाळांना सुरुवातीच्या दिवसांत त्यानुसार विद्यार्थ्यांची उजळणी करून घेण्यात येईल, असे मोठ्या गाजावाजात शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले; मात्र शिक्षण विभागाने शाळा सुरू होऊन तब्बल १४ दिवसांनी का होईना ‘ब्रिज कोर्स’ सुरू करण्याचा मुहूर्त सापडला.

Advertisement

गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांना ऑनलाइनद्वारे शिक्षण देण्यात आले असून, त्याच आधारे विद्यार्थ्यांचा पुढील वर्गात प्रवेशही झाला आहे; परंतु पुढील वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांना मागील इयत्तेतील अभ्यासक्रम नीट समजला आहे की नाही,

तसेच या अभ्यासक्रमातील संकल्पना अधिक स्पष्ट करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) वतीने सेतू अभ्यासक्रम म्हणजे ब्रिज कोर्स आखण्यात आला आहे.

आराखडा न मिळाल्याने गोंधळ
शालेय शिक्षण विभागाने या अभ्यासक्रमाबाबत शाळा सुरू होण्यापूर्वी माहिती दिली होती. त्यामुळे राज्यात १५ जूनला शाळा सुरू झाल्यानंतर सर्व शाळांना, मुख्याध्यापक, शिक्षकांना या अभ्यासक्रमाची प्रतीक्षा लागली होती;

Advertisement

मात्र हा अभ्यासक्रम कसा राबवायचा याचा आराखडा न मिळाल्याने मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा गोंधळ उडाला. दरम्यान, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी आपापल्या परीने विद्यार्थ्यांची मागील वर्षाच्या अभ्यासक्रमाची उजळणी घेण्यास सुरुवात केली आहे.

आज उद्‌घाटन
शाळा सुरू होऊन तब्बल १४ दिवस उलटून गेल्यानंतर आता परिषदेतर्फे येत्या सोमवारी (ता. २८) या अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

त्यामुळे आतापर्यंत उजळणी घेणाऱ्या शाळांना शिक्षण विभागाच्या उशिराने आलेल्या ‘ब्रिज कोर्स’प्रमाणे पुन्हा उजळणी करून घ्यावी लागणार असल्याने शिक्षकांची डोकेदुखी वाढणार आहे.

Advertisement

हे राहणार उपस्थित
सेतू अभ्यासक्रमाचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते ऑनलाइन स्वरूपात येत्या सोमवारी (ता.२८) सकाळी अकरा वाजता होणार आहे.

या वेळी शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी हे उपस्थित असणार आहेत.

Advertisement