दुकानांची वेळ वाढवून द्या, अशी मागणी व्यापारी वारंवार करत आहे. राज्य सरकार याबाबत गंभीरपणे चर्चा करीत आहे. सुरू आहे. तिसऱ्या लाटेचा धोका आहे, असे म्हटलं जातं.

नागरिकांची जीवितहानी टाळणे हे महत्वाचे आहे. थोडीशी ढिल दिली, की लोक गैरफायदा घेतात, असे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे

महसूल दिनाचा कार्यक्रम

महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमानंतर महसूलमंत्री थोरात पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, विभागीय आयुक्त सौरभ राव, नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी राजेश देशमुख उपस्थित होते.

Advertisement

टास्क फोर्ससोबतच्या बैठकीनंतर निर्णय

लग्न सोहळे मोठ्या स्वरूपात होतात. नागरिकांनी देखील स्वतःची काळजी घेतली पाहिजे. टास्क फोर्ससोबत मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते निर्णय घेतील. सर्वांना त्रास होत आहे.

हातावर पोट असलेल्यांना याचा अधिक त्रास आहे. व्यापाऱ्यांना त्रास होतो; पण समाजाच्या हिताचे, त्यांच्या जीविताचे काय याचा देखील विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले आहेत.

फडणवीसांच्या मागणीची माहिती घेतो…

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांच्या मदतीबाबत निकष बदलण्याची मागणी केली आहे. त्यासाठी २६ कलमी मागणी केली आहे.

Advertisement

त्याबाबत तुम्ही निकष बदलणार का, या प्रश्नाला उत्तर देताना थोरात म्हणाले, की फडणवीस यांनी काय २६ कलमी मागणी केली आहे, याची अजून मला माहिती नाही; मात्र फडणवीस यांनी त्यांच्या काळात या २६ कलमी मागणीतील किती कलमे वापरलेत हेही जनतेला सांगावे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जे-जे शक्य आहे. ते आम्ही करत आहोत, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

 

Advertisement