कोरोना काळात सर्वात जास्त गरिबी भारतात वाढल्याच्या एका अहवालाचा हवाला देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

मोदींनी आपल्या चुका कबूल केल्या तरच देशाचे पुनर्निर्माण शक्य असल्याचे राहुल गांधी म्हणाले.कोरोना महामारी काळातील मोदी सरकारच्या भोंगळ कारभारामुळेच देश गरिबीच्या खाईत लोटला गेल्याची टीका राहुल गांधी यांनी गुरुवारी ट्विटरवरून केली.

या ट्विटसोबत एक अहवाल जोडत, त्यांनी हे सरकारच्या महामारीतील गैरव्यवस्थापनाचा परिणाम असल्याचे म्हटले; परंतु आपल्याला भविष्याकडे पाहावे लागेल. आपल्या देशांची पुनर्बांधणी तेव्हा सुरू होईल, ज्यावेळी पंतप्रधान आपल्या चुका मान्य करतील आणि विशेषज्ज्ञांची मदत घेतील.

Advertisement

चुका नाकारत राहिल्यास यातून कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले. ट्विटसोबत टाकलेल्या अहवालात महामारी काळात जगभरात गरिबी वाढल्याचे नमूद करण्यात आले. जगभरात वाढलेल्या गरिबीत सर्वाधिक वाटा भारताला असल्याचे यात नोंदविण्यात आले आहे.

उल्लेखनीय म्हणजे काँग्रेस खासदार राहुल गांधी गत काही कालावधीपासून कोरोनाचे संकट हाताळण्यावरून सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आहेत. त्याचबरोबर डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, बेरोजगारी आणि इंधन दरवाढ यांसारख्या मुद्यांवरून देखील त्यांनी मोदी सरकारला धारेवर धरले आहे.

Advertisement