मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज मुंबई ते नेरुळ, बेलापूर, जेएनपीटी, एलिफंटा वॉटर टॅक्सी सेवेचे लोकार्पण कार्यक्रम पार पडला आहे. यावेळी त्यांनी अनेकांचे आभार व्यक्त केले आहेत.

या प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे आभार मानत ते स्वत:ला प्रधानसेवक म्हणतात. तसेच लोकोपयोगी कामासाठी महाराष्ट्र सरकार मागे हटणार नाही. आपले सहकार्य सोबत असुद्या,असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

तसेच पुढे ते म्हणाले की, वॉटर टॅक्सीही (Water Taxi) देशात पहिली सेवा सुरू करत आहोत, मुंबईला (Mumbai) प्राधान्य दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री सोनोवाल यांचे मी आभार मानतो असे ते म्हणाले.

Advertisement

त्याचसोबत पहिली रेल्वे सेवा मुंबई ते ठाणे धावली. मुंबईत सुरू झालेली सुविधा देशात स्वीकारली जाते, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्राचे महत्व ओळखून आरामार सुरू केले आहे.

ब्रिटिशानी पुढे ते सुरू ठेवले आणि मुंबई हे बेट तयार झाले. ही वॉटर टॅक्सी एलिफंटा लेणी (Elephanta Caves) आहेत तिकडेही जाईल, असाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी विश्वास दाखवला आहे.

सदर कार्यक्रम केंद्रीय मंत्री सर्वा सर्बानंद सोनोवाल,अजित पवार, (Ajit Pawar) एकनाथ शिंदे,(Eknath Shinde) अस्लम शेख (Aslam Sheikh) यांच्या उपस्थितीत पार पडला आहे.

Advertisement