महिला कर्मचा-याचा विनयभंग केल्यावरून मोठा गदारोळ झाल्यानंतर ठाणे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वानाथ केळकर यांच्या विरोधात अखेर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवस वाद

गेल्या दोन दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी आणि उपायुक्त असलेल्या डाॅ. केळकर यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत होती.

भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या प्रकरणात आवाज उठविला होता. त्यामुळे महिला कर्मचा-याच्या विनयभंग प्रकरणी अखेर कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

कोरोना रुग्णालयातील 38 वर्षीय माजी महिला कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वाघ यांच्याकडून गंभीर दखल

चित्रा वाघ यांनी 14 जुलै रोजी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन नंतर पोलिसात तक्रार केली. त्यांनी पत्रकार परिषद घेत वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वनाथ केळकर यांच्यावर गंभीर आरोप केले.

चित्रा वाघ काय म्हणाल्या ?

“डॉ. विश्वनाथ केळकर यांनी पीडित मुलीला आधी ठाणे महापालिका क्षेत्रात आरोग्य विभागात स्टाफ नर्समधून बढती दिली. त्यानंतर त्यांनी मुलीचा छळ केला.

Advertisement

तिला कामावरून काढून टाकले. केळकर यांनी मुलीसोबत अश्लील भाषेत बातचित केली. मुलीला गेल्या दोन महिन्यांपासून न्याय मिळालेला नाही”, असं त्या म्हणाल्या.

न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही

“पीडित मुलगी न्याय मिळवण्यासाठी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेली होती; पण पोलिसांनी तिची दिशाभूल करण्याचे काम केले.

दुसरीकडे जी विशाखा समिती डॉ. केळकर यांनी नेमली आहे. तिने दखल घेतली नाही. जोपर्यंत डॉ. केळकर यांना कामावरून काढत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत”, असा इशारा वाघ यांनी दिला.

Advertisement