पुणे – जगभरात गेल्या दोन वर्षापासून करोनाने (corona) अक्षरशः थैमान घातला होता. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात करोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona Update) कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच आता, पुन्हा एकदा करोना विषाणूननं आपलं डोक वर काढलं आहे. राज्यात करोनाचा (Corona Update) विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

रुग्णांमध्ये देखील झपाट्याने होत असून, संभाव्य चौथ्या लाटेची चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य विभागाने सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाने (Ministry of Health) जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्याप सुरुच आहे. गेल्या 24 तासांत देशात 16 हजार 47 नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती.

सध्या 1,28,261 सक्रिय रुग्ण देशात आहेत. तर, नव्या आकड्यांनुसार, गेल्या 24 तासांत 19,539 रुग्ण करोनामुक्त (Corona Update) झाले आहेत.

तर काल, म्हणजेच, 9 ऑगस्ट रोजी 12,751 नव्या रुग्णांची नोंद झाली होती, 8 ऑगस्ट रोजी 16167 नव्या करोनाबाधितांची नोंद, 7 ऑगस्ट रोजी 18,738 नव्या रुग्णांची नोंद,

6 ऑगस्ट रोजी 19,406 नवीन प्रकरणे, 4 ऑगस्ट रोजी 19,893 नवीन प्रकरणे आणि 3 ऑगस्ट रोजी 17,135 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

तर दुसरीकडे राज्यातील करोना रुग्णसंख्येत (Corona Update) चढ-उतार होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 1782 नव्या रुग्णांची भर पडली होती. तर काल सात करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

तर काल दिवसभरात राज्यात एकूण 1854 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील एकूण करोनाबाधितांची राज्यात काल एकूण 11,889 इतके रुग्ण सक्रिय असून सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या ही मुंबईमध्ये असल्याचं समोर आलं आहे.

मात्र, अशीच रुग्णांमध्ये झपाट्याने वाढली तर संभाव्य चौथ्या लाटेची चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य विभागाने सुद्धा नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.