Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

अकरावी प्रवेश परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करणार

राज्यातील दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. अकरावीसाठी सीईटी शासनानं जाहीर केली आहे. सीईटीच्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर कर.

सीईटी घेण्याचे आदेश राज्य मंडळाला मिळाले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.

दहावीचा निकाल असा

दहावीच्या परीक्षेचा राज्याचा निकाल 99. 95 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल शंभर टक्के, मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे.

Advertisement

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ अकरावी प्रवेशासाठी सीईटीसंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. अकरावीच्या सीईटी परीक्षेचं वेळापत्रक लवकरच जाहीर करु, असं पाटील म्हणाले.

पाटील नेमकं काय म्हणाले ?

सीईटी संदर्भात न्यायालयीन बाब आहे का असं विचारलं असता त्यांनी न्यायालयात काही पेंडिंग नाही असं सांगितलं.आम्ही सीईटी परीक्षेचं वेळापत्रक तयार करत आहोत आणि पुढे जाणार आहोत. ही परीक्षा वैकल्पिक ठेवली आहे.

जे विद्यार्थी सीईटी देऊ इच्छितात त्यांच्यासाठी पोर्टल सुरु करु, असं दिनकर पाटील म्हणाले. सीईटीची डेडलाईन 21 ऑगस्ट पर्यंत जाईल. सीईटीसंदर्भात लवकरच नोटिफिकेशन जारी केलं जाईल.

Advertisement

 

Leave a comment