विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सावध पवित्रा घेताना दिसत आहे. विरोधकांकडून कोणताही दगाफटका होऊ नये, म्हणून आवाजी पद्धतीने मतदान घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

राज्य विधिमंडळाच्या नियमानुसार विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात येते; मात्र ही निवडणूक आवाजी पद्धतीने घेण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत.

प्रस्ताव सभागृहाच्या पटलावर ठेवणार

हा प्रस्ताव विधिमंडळ नियम समितीमध्ये पारित झाला आहे. प्रस्ताव सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार असून या संदर्भात मसुदा तयार करण्याचे काम सुरू आहे.

Advertisement

या समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या चारही प्रमुख पक्षांचे प्रत्येकी दोन सदस्य आहेत.

घाबरताय का? पाहूया ताकद”

विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी नियम बदलावे लागणार आहेत, ही बैठक अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली व्हावी लागते; पण अध्यक्षच नाहीत.

तुमच्याकडे बहुमत आहे, मग घाबरताय का? हात वर करून का? घ्या मतदान, पाहूया ताकद, असे आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Advertisement

कुणावरच नाही विश्वास

महाराष्ट्राच्या 60 वर्षांच्या काळात हे कधीही घडलं नव्हतं. यांचा ना एकमेकांवर विश्वास आहे, ना आमदारांवर, अशी टीकाही फडणवीसांनी केली.

“त्या दिवशी पर्यायी सरकार देऊ”

आम्ही सक्षम विरोधी पक्षनेते आहोत. लोकांसाठी आम्ही काम करणार आहोत, हे सरकार आपल्या वजनाने कोसळेल, आज-उद्या कोसळेल हे मी कधी सांगितलं नाही, पण ज्या दिवशी कोसळेल, त्या दिवशी पर्यायी सरकार देऊ, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

 

Advertisement