ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाणार असून ही समिती शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणार आहे.

या समितीत अध्यक्ष सरपंच राहणार असून सदस्य म्हणून तलाठी शाळा समितीचे अध्यक्ष, वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक केंद्र प्रमुख तर ग्रामसेवक हे सदस्य सचिव राहणार आहेत.

वर्ग सुरू करण्याबाबत किती ठिकाणावरून ठराव येतात यावरून जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

Advertisement

१५ तारखेपासून शाळा सुरू होणार

आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू करण्यात येणार असून यासाठी गावाने जबाबदारी स्वीकारावी, असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. पालकमंत्री गायकवाड हिंगोली जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.

या वेळी त्यांना शाळा सुरू करण्याबाबत माहिती विचारली असता त्या म्हणाल्या, की गावात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली एक समिती या संदर्भात निर्णय घेणार आहे.

मुलांना टप्प्याटप्प्याने बोलवणार

मागील महिनाभरापासून एकही रुग्ण न आढळलेल्या ठिकाणी वर्ग सुरू केले जाणार आहेत. शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करावे. विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेच्या परिसरात मनाई करण्यात आली आहे.

Advertisement

शाळा सुरू करताना मुलांना टप्याटप्यात शाळेत बोलविण्यात यावे. त्यासाठी वर्गांना अदला बदलीच्या दिवशी सकाळी, दुपारी नियोजनानुसार वर्ग सुरू करावेत. एका बाकावर एकच विद्यार्थी बसवावा.

यासह इतर विविध उपायोजना करण्याच्या मार्गदर्शक सूचनाही शिक्षण विभागाने दिल्या आहेत. तिसऱ्या लाटेचा विचार करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. सर्व विद्यार्थ्यांची योग्य ती काळजी घेतली जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

 

Advertisement