दिल्लीत कोरोना विषाणूची दुसरी लाट कमकुवत झाली असली तरी सरकार अद्याप तिसरी लाट रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात गुंतले आहे. त्यासाठी वैद्यकीय सहाय्यक पदासाठी भरती होणार आहे.

एकूण 5000 हजार पदांसाठी भरती करण्यात येणार आहेत. 17 जून 2021 रोजी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज थेट पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ते म्हणाले की, कम्युनिटी नर्सिंग असिस्टंट किंवा मेडिकल असिस्टंटच्या 5000 पदांसाठी दिल्ली सरकार भरती करेल. मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की ही भरतीत प्रथम येणा-या लोकांना प्राधान्य दिले जाईल. इच्छुक व पात्र उमेदवार अधिक माहितीसाठी दिल्ली सरकारच्या संकेतस्थळावर तपासणी करु शकतात.

Advertisement

वैद्यकीय सहाय्यक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे. तर उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. याबरोबरच निवडलेल्या उमेदवारांना गुरु गोबिंदसिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठाकडून प्रशिक्षण दिले जाईल. या 5000 सहाय्यकांना 28 जून 2021 पासून 500 च्या तुकड्यांमध्ये प्रत्येकी 2 आठवड्यांसाठी प्रशिक्षण दिले जाईल.

या प्रमाणे अर्ज करा

दिल्ली सरकारने जाहीर केलेल्या वैद्यकीय सहाय्यक पदांसाठी ऑनलाईन अर्ज सरकार स्वीकारतील. तर पात्र आणि इच्छुक उमेदवार या अधिसूचनेबद्दल अधिक माहितीसाठी दिल्ली सरकारच्या अधिकृत साइटवर लक्ष ठेवू शकतात.

निवड झालेल्या उमेदवारांना पॅरामेडिक्स, लाइफ केअर, होम केअर, व्हॅक्सिन आणि नमुने गोळा करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. त्याच वेळी, घोषणेनुसार उमेदवारांनी लक्षात घ्यावे की भरती केलेले वैद्यकीय सहाय्यक केवळ डॉक्टर आणि परिचारिकांनाच मदत करतील. त्यांना रुग्णाच्या उपचारांमध्ये कोणताही निर्णय घेण्याची मुभा असणार नाही.

Advertisement