Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

मेट्रोसाठी झोपडपट्या पाडण्यास सुरुवात

पुणेः मेट्रोच्या कामासाठी शिवाजीनगर भागातील झोपडपट्यांची जागा अधिगृहीत करण्यात आल्या असून त्या पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन

शिवाजीनगर येथील कामगार पुतळा आणि राजीव गांधी वसाहत येथील ८० टक्के झोपडीधारकांचे पुनर्वसन पूर्ण झाले असून,

येत्या महिनाअखेरपर्यंत सर्व पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. येथील काही झोपड्या पाडून जागा रिकामी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो)

आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मेट्रो प्रकल्पांसाठी धान्य गोदामालगतच्या दोन्ही झोपडीधारकांचे स्थलांतर गेल्या महिन्यापासून सुरू झाले आहे.

जूनअखेर सर्वांचे पुनर्वसन

सुमारे तेराशे झोपड्यांपैकी ९५० झोपडीधारक पुनर्वसनासाठी पात्र ठरले होते. त्यांना विमाननगर आणि हडपसर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) सदनिकांमध्ये स्थलांतरित करण्याची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.

आतापर्यंत ७५० झोपडीधारकांचे पुनर्वसन पूर्ण झाल्याची माहिती ‘एसआरए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी दिली.

येत्या जूनअखेरपर्यंत सर्व पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन पूर्ण करून सर्व जागा मेट्रो प्राधिकरणाच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

झोपडीधारकांना अपिलाची संधी

सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेल्या झोपडीधारकांना सदनिकांचे वाटप करण्यात आले आहे; तरीही अपात्र ठरलेल्या झोपडीधारकांना अपील करण्याची संधी देण्यात आली आहे.

योग्य संधी दिल्यानंतरही झोपडी खाली करण्यास टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांवर निष्कासनाची कारवाई करण्याचा इशारा निंबाळकर यांनी दिला.

Leave a comment