Breaking News Updates of Pune

डाॅक्टरांनी माझ्या मृत्यूच्या घाेषणेची देखील तयारी केली हाेती – पंतप्रधान बाेरिस जाॅन्सन

काेराेना संसर्गाचा सामना करत हाेताे. तेव्हा डाॅक्टरांनी माझ्या मृत्यूच्या घाेषणेचीदेखील तयारी केली हाेती. एवढेच नव्हे तर माझ्या मृत्यूनंतर निर्माण हाेणाऱ्या परिस्थितीला हाताळण्याची रणनीतीदेखील तयार करण्यात आली हाेती, अशी माहिती खुद्द ब्रिटनचे पंतप्रधान बाेरिस जाॅन्सन यांनी जाहीर केली.

गेल्या महिन्यात सेंट थाॅमस रुग्णालयात जीवन व मृत्यूशी संघर्ष केल्यानंतर ठणठणीत हाेऊन परतलेले बाेरिस जाॅन्सन यांनी ‘द सन’ला दिलेल्या मुलाखतीत आपबीती सांगितली.

ते म्हणाले, ताे अतिशय वाईट काळ हाेता. माझी स्थिती अतिशय वाईट हाेती. आणीबाणीच्या परिस्थितीमधील याेजना तयार झाली आहे. मला मास्क लावून अनेक लिटर ऑक्सिजन देण्यात आले.

मला आयसीयूमध्ये हलवण्यात आले. तेव्हा माझी दुर्दशा लक्षात आली. माॅनिटरवरील संकेतही चुकीच्या दिशेने जाताना दिसून आले. जीव वाचण्याची शक्यता ५०-५० हाेती. बरेवाईट झाल्यानंतरच्या स्थितीत डाॅक्टरांकडे सर्व प्रकारची व्यवस्था हाेती.

तसे तर स्टॅलिन यांच्यासाठी जशा प्रकारे झाली हाेती. तशीच मृत्यूची सर्व तयारी डाॅक्टरांनीदेखील केली हाेती. परंतु, दाेन आठवड्यांच्या वेदनेनंतर मी बरा झालाे. हे सर्व काही अद्भुत नर्सिंगमुळे प्रत्यक्षात येऊ शकले. त्यांच्यामुळेच खूप माेठा बदल झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.