पुणे आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकांना जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कर्जप्रकरणी नोटीस बजावल्यानंतर आता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला पत्र पाठवून कर्ज प्रकरणाची माहिती मागविली आहे.

नोटीस नाही, पत्र

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस दिल्याची चर्चा सुरू झाली होती; मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेचा जरंडेश्वर साखर कारखान्याशी थेट संबंध नसून पुणे जिल्हा बँकेमार्फत केलेल्या पतपुरवठया संदर्भात ईडीकडून माहितीसाठी पत्र आले आहे.

ईडीने बँकेला नोटीस बजावली नसल्याचं स्पष्टीकरण जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिलं आहे.

Advertisement

अफवांवर विश्वास ठेवू नका

सावंत यांनी राजकीय विरोधकांकडून पसरवल्या जाणा-या बातम्यांवर ठेवीदारांनी विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व ठेवीदारांच्या ठेवी या बँकेत सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली.

जरंडेश्वरला नेमकं कर्ज कसं दिलं ?

जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यास 2017-18 या आर्थिक वर्षापासून पुणे जिल्हा बँकेच्या सहभागातून व त्यांच्यामार्फत बँकेने मशिनरी आधुनिकीकरण, सहवीज निर्मिती व इथेनॉल प्रकल्पासाठी कर्जपुरवठा केला.

Advertisement

बँकेने वितरीत केलेल्या सर्व प्रकारच्या कर्जाची वसुली जून २०२१ अखेर नियमित सुरू असून बँकेने दिलेल्या कर्जासाठी पुरेसे तारण घेण्यात आलेले आहे, असे त्यांनी सांगितलं.

ईडीनं मागितलेली माहिती देणार

अंमलबजावणी संचनालयाने बँकेकडे जरंडेश्वर साखर कारखान्याला पुरवठा केलेल्या कर्जाची माहिती बँकेकडे मागितली असून त्या कागदपत्रांची पूर्तता करणार असल्याची माहिती ही सावंत यांनी दिली आहे.

 

Advertisement