विधानसभेच्या अध्यक्षांची निवड बिनविरोध झाली, तर उपकारःराऊत

“सध्याची परिस्थिती पाहता निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी जर विरोधी पक्षाकडून सकारात्मक प्रयत्न झाले तर ते उपकारच होतील; परंतु जर त्यांनी निवडणूक लादली, तर महाविकास आघाच्या उमेदवाराचा विजय नक्की आहे, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला.

विसंवादाचा फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न

गेले काही दिवस विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक हा विषय महाराष्ट्राच्या राजकारणात गाजतो आहे. हे पद काँग्रेसच्या अखत्यारित असल्याने त्यांचा उमेदवार काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी ठरवतील, असं महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सांगितले जात आहे.

ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आशा सत्ताधारी व्यक्त करत आहेत; मात्र महाविकास आघाडीतील कथित विसंवादाचा फायदा भाजपचे राज्यातील नेते घेतील आणि या निवडणुकाच्या माध्यमातून काही वेगळा प्रयत्न करू शकतील अशी चर्चा आहे.

जिंकणार तर आम्हीच !

याबद्दल “कोणी कितीही प्रयत्न केले, तरीही विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचाच होणार”, असा ठाम दावा राऊत यांनी केला. सध्या कोरोनास्थिती आहे.

अशा वेळी ताणाताणी कशासाठी करायची? विरोधकांनी कितीही आरडाओरड केली, कितीही संशय पेरण्याचा प्रयत्न केला, तरी अशा स्थितीत विरोधकांना निवडणुकीच मूळीच यश मिळणार नाही. जिंकणार तर आम्हीच!”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.