Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पदार्फाश ; दोन महिलांसह सहा जणांना अटक

गंभीर गुन्ह्यात आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रे बनवून न्यायालयाचीच फसवणूक करणाऱ्या टोळीचा पिंपरी पोलिसांनी पदार्फाश केला. या प्रकरणी मंगळवारी (दि.१५) पिंपरी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून सहा जणांना अटक केली आहे.

विशेष म्हणजे यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. पहिल्या गुन्ह्यात सुनील मारुती गायकवाड (वय ५२, रा. चावडी चौक, आळंदी), नंदा एकनाथ थोरात (वय ४३, रा. इंद्रायणी नगर, आळंदी), पौर्णीमा प्रशांत काटे (वय ३०, रा. इंद्रायणी नगर, आळंदी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलीस शिपाई रोहित सुधाकर पिंजरकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यात सलमान ताजुद्दीन मुजावर (वय २४), समाधान प्रभाकर गायकवाड (वय २३), श्रीधर मगन शिंदे (वय २३,सर्व रा. काटे चाळ दापोडी) यांना अटक करण्यात आली आहे.

Advertisement

या प्रकरणात पोलीस शिपाई उमेश वानखडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील दोन्ही गुन्ह्यातील आरोपी शिवाजीनगर कोर्ट पुणे आणि इतर कोर्टामध्ये चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा, पॉक्सो यांसारख्या गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींना जामीन करून देण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करत असत.

त्यामध्ये आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, सातबाराचे उतारे अशी शासकीय दस्तऐवज जामीन मिळवून देण्यासाठी तयार केली जात. जे आरोपी जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा कोर्टाच्या कामासाठी हजर राहणार नाहीत,अशा आरोपींना जामीन देण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे बनावट नावे धारण करून ठराविक व ओळखीच्या वकिलांच्या मागणीनुसार कोर्टात जामीनदार म्हणून हजर केले जात असे.

त्याआधारे आरोपींना कोर्टातून जामिनावर सोडले जात असत. याबाबत पिंपरी पोलिसांना माहिती मिळाली असता पिंपरीतील मोरवाडी न्यायालय परिसरात सापळा रचून सहा जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणी आणखी नावे समोर येणाची शक्यता असून पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Advertisement
Leave a comment