धबधबे पाहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा आणि त्यांना वाचवायला गेलेल्या त्यांच्या पित्याचा मृत्यू झाला. पिराजी गणपती सुळे (वय ४५ ) , साई पिराजी सुळे( वय १४), सचिन पिराजी सुळे (वय १२) रा.इंद्रायणी काॅलनी कामशेत, मूळगाव नायगाव वाडी जि.नांदेड , अशी मृत्यू पावलेल्या बापलेकांची नावे आहेत.

काय घडले ?

रविवारी सकाळी पिराजी दोन्ही लेकरांना घेऊन कुसगाव खुर्द येथील धबधबे पहायला गेला होते. धबधब्याच्या पायथ्याशी उत्खनन केलेल्या जागी पाण्याचे मोठे डबके साचले आहे. या डबक्यात दोन मुले बुडू लागल्याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात पिराजी यांचाही बुडून मृत्यू झाला.

माउलीचा हंबरडा

जवळच जनावरे राखणाऱ्या एका शेतकऱ्याने यांना बुडताना पाहिले. तेव्हा त्यांनी आरडाओरड करून गावकरी गोळा झाले. त्यांना चिखलाच्या दलदलीतून बाहेर काढले; पण जागेवरच त्यांचा मृत्यू झाला.

Advertisement

येथेच भर पावसात पिराजीची पत्नी विठाबाई हिने फोडलेल्या हंबरडयाने उपस्थितांचे डोळे पाणावले. त्यांचा पाच वर्षांचा एक मुलगा घरी थाबला होता.

पिराजी नाक्यावर थांबून बिगारी काम करायचा. घटनास्थळी पोलिस पोहोचण्यापूर्वी स्थानिक गावकऱ्यांनी मदत केली.

 

Advertisement