ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

चित्रपट सृष्टीतील गुन्हेगारी मोडून काढणार

प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येनंतर चित्रपट सृष्टीतील गुंडाराज समोर आले आहे.

भाजपचे आमदार राम कदम यांच्या संघटनेची गुंडगिरी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी केल्यानंतर मराठी चित्रपट सृष्टीतील वाढलेली गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी गृह विभागाने कठोर पाऊल उचलले असून यापुढे अशाप्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही.

दोषी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.

वचक होईल अशी कारवाई करा

मंत्रालयातील समिती सभागृहात वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येसंदर्भात व मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ व निर्माता यांना चित्रपट युनियनच्या पदाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल पोलिस विभागाकडून करणे आवश्यक असलेल्या कार्यवाहीबाबत आढावा बैठक घेण्यात आली.

या वेळी वळसे पाटील यांनी कठोर शब्दांत इशारा दिला. चित्रपट सृष्टीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करणे गरजेचे आहे.

यापूर्वीच्या सर्व गुन्ह्यांसंदर्भातील दोषींवर कठोर कारवाई करावी. ज्यायोगे सर्वावर वचक निर्माण होईल. आवश्यकता भासल्यास विशेष चौकशी समिती नेमण्यात यावी, असे निर्देश वळसे पाटील यांनी दिले.

कलाकार, कामगारांचे पगार बँकांत जमा करा

कामगार विभागाने या क्षेत्रातील कामगारांना थेट बँकामार्फत वेतन अदा करण्यासाठी आवश्यक ती धोरणात्मक कार्यवाही करावी.

कामगारांना संरक्षण देण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये जागरूकता आणण्यासाठी नवीन धोरण तयार करावे अशा सूचनाही त्यांनी कामगार आयुक्तांना दिल्या.

गृहविभागाच्या नियंत्रणाखाली सर्व संबंधित विभागांची एक स्वतंत्र समिती कायमस्वरूपी गठीत करण्याच्या सूचनाही त्यांनी गृह विभागास दिल्या.

 

You might also like
2 li