ज्यांना समाज जवळ उभा करीत नाही, ज्यांची कायम उपेक्षा केली जाते, त्यांच्या आजारपणाच्या काळात त्यांच्यावर उपचार होणे शक्यच नाही. अशा तृतीयपंथीयांवरील उपचारासाठी पुण्यात क्लिनिक सुरू झाले आहे.

तृतीयपंथीयांचे तृतीयपंथीयांसाठी क्लिनिक

तृतीयपंथीयांनी तृतीयपंथीयांसाठी सुरू केलेल्या राज्यातील पहिल्या क्लिनिकला शहरात प्रारंभ झाला. शहरातील सुमारे चार हजार तृतीयपंथियांना त्याचा उपयोग होणार आहे. तृतीयपंथीयांना मूलभूत अधिकारांच्या पायमल्लीबरोबरच अनेक समस्या भेडसावतात.

तृतीयपंथी व्यक्तींना बहुतांश वेळा आरोग्य सुविधा, राहण्यासाठी घर मिळत नाही. त्यामुळे त्यांना काही काळ पदपथावर राहावे लागते.

Advertisement

या घटकला किफायतशीर दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती सोनल दळवी यांनी दिली.

सर्व कर्मचारी ही तृतीयपंथी

तृतीयपंथीयांना खासगी रुग्णालयांचे दर परवडत नाही. त्यांच्यासाठी हे क्लिनिक दिलासा ठरेल. या रुग्णालयात अगदी कमी शुल्कात तृतीयपंथीयांच्या सर्व वयोगटातील रुग्णांचे उपचार करण्यात येतील.

त्यांच्याकडून तपासणी शुल्क आकारण्यात येणार नाही. क्लिनिकमधील सर्व कर्मचारी हे तृतीयपंथी असतील, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement