ब्रिटनमध्ये ओमिक्रॉन व्हायरंटचा पहिला मृत्यू झाला आहे. स्वत: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ही माहिती दिली आहे. (Covid-19: UK reports first death with Omicron variant)

या स्ट्रेनमुळे शेकडो लोकांना रुग्णालयात दाखल कराव लागत आहे. 30 पेक्षा अधिक वयाच्या लोकांनी कोरोना व्हॅक्सीनचा बुस्टर डोस घ्यावा, असं आवाहन करतानाच ओमिक्रानकडे जराही दुर्लक्ष करू नका, असा सावधतेचा इशाराही बोरिस जॉन्सन यांनी दिला आहे.

वेस्ट लंडनच्या पॅडिंगटनमध्ये लसीकरणाच्या वेळी पंतप्रधान जॉन्सन यांनी ही माहिती दिली. ओमिक्रॉनचा संसर्ग होत असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. ओमिक्रॉनमुळे एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे, असं जॉन्सन यांनी सांगितलं.

Advertisement

ओमिक्रॉनचा संसर्ग वाढू लागल्याने ब्रिटनमध्येन नागरिकांना बुस्टर डोस दिला जात आहे. 30 वर्षावरी व्यक्तींना हे बुस्टर डोस दिले जात आहेत. देशात ओमिक्रॉनचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे.

त्यामुळे हा संसर्ग रोखण्यसाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे, अशी माहिती ब्रिटनच्या आरोग्य अधिकाऱ्याने सांगितलं. इंग्लंडच्या राष्ट्री आरोग्य सेवा विभागाच्या मते, देशात 30 ते 39 वयोगटातील 75 लाख लोक आहेत. त्यामध्ये 35 लाख लोकांना आजपासून बुस्टर डोस देण्यात येणार आहे.

ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचा पहिलाच बळी गेला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत ओमिक्रॉनचा संसर्ग डेल्टा व्हेरिएंटला मागे टाकेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

Advertisement

कोविड 19 बुस्टर डोसचा कार्यक्रम वेगाने राबवला जात आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 2.2 कोटी लोकांना बुस्टर डोस देण्यात आला आहे, असं ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जावेद यांनी सांगितलं.

One person in the UK has died with the Omicron variant of coronavirus, the prime minister has said.

Advertisement