चार वर्षांच्या मुलीनं जागतिक विक्रम नोंदविला. तिच्या या विक्रमाची जगातील तीन प्रमुख रेकार्ड बुकनं नोंद केली. या चिमुकलीनं अवघ्या तीन मिनिटं दहा सेंकदात 195 देशांचे ध्वज पाहून देशाचं नाव आणि राजधानी सांगितली.

काय आहे चिमुकलीचा विक्रम ?

पुणे जिल्ह्यातील मंचर जवळच्या चिंचोडी देशपांडे येथील रहिवासी असणाऱ्या चार वर्षांच्या चिमुकलीनं जागतिक विक्रम केला आहे.

जगातील तीन प्रमुख रेकॉर्ड बुकनं तिच्या नावाची नोंद केली आहे. या चिमुकलीनं अवघ्या तीन मिनिटं दहा सेंकदात 195 देशांचे ध्वज पाहून देशाचं नाव आणि राजधानी सांगितली.

Advertisement

तिनं या अनोख्या कामगिरीनं पुण्याचं आणि महाराष्ट्राचं नाव जागतिक स्तरावर पोहोचवलं आहे. एखादी गोष्टी आत्मसात करण्याच्या तिच्या कौशल्याचं जगभर कौतुक होतं आहे.

ईशान्वीची अभूतपूर्व कामगिरी

ईशान्वी बाळासाहेब आढळराव पाटील असं जागतिक विक्रम रचणाऱ्या चिमुकलीचं नाव आहे. अवघ्या चार वर्षे अकरा महिने वय असणाऱ्या एका चिमुरडीनं ही अभूतपूर्व कामगिरी केली आहे.

15 जून रोजी दुबईत ही जागतिक स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेत ईशान्वीनं तब्बल 195 देशांचे ध्वज पाहून देशाचं आणि राजधानीचं नाव अवघ्या 3 मिनिटे 10 सेकंदात सांगण्याचा जागतिक विक्रम केला आहे.

Advertisement

गावक-यांना अभिमान

इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड या तीन रेकॉर्ड बुकमध्ये तिचा हा विक्रम नोंदला गेला आहे.

ईशान्वीची जिद्द, चिकाटी आणि आत्मसात करण्याची क्षमता अफलातून आहे. तिच्या या कौशल्याचं अनेक स्तरातून कौतुक केलं जात आहे.

तिच्या या विक्रमानं आंबेगाव तालुका आणि महाराष्ट्राची मान अभिमानानं उंचावल्याची भावना गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Advertisement

अत्यंत लहान वयात तिनं डोंगराएवढी कामगिरी केल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया ईशान्वीची आई नीता आढळराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.