बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले असे म्हटले जाते. नेत्यांच्या बाबतीत ते ब-याचदा उलटे होते. सभेत सांगायचे एक आणि वागायचे त्याच्या विपरीत असे घडते.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील संयमी, शांत आणि नियम पाळणारे; परंतु त्यांच्याच कार्यक्रमा कोरोनाचे नियम धाब्यावर बसवले गेले.

ग्रामपंचायतीच्या भूमिपूजनाला तुफान गर्दी

वळसे पाटील यांनी शुक्रवारीच पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना संसर्ग रोखण्यासाठी अनेक निर्बंध कायम ठेवले; मात्र पुणेकरांना नियम सांगणाऱ्या गृहमंत्र्यांच्याच कार्यक्रमात त्याच नियमांचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला.

Advertisement

रांजणगाव येथे त्यांच्या हस्ते ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन झाले. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी गेली. ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत असताना गृहमंत्र्यांच्याच कार्यक्रमात कोरोना नियमांना हरताळ फासला गेला.

गृहमंत्र्यांनाच नियमांचा विसर

मागच्याच आठवड्यात पुण्यात राष्ट्रीवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्यात असाच प्रकार घडला होता.

त्या वेळी अजित पवार यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती, तर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह 150 जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला.

Advertisement

यासर्वांना अटक करुन जामिनावर सोडण्यात आलं. ही घटना ताजी असतानाच गृहमंत्री मात्र, कोरोना नियम विसरले की काय असा प्रश्न निर्माण झाला.

नागरिकांसाठीच नियम

शुक्रवारी खुद्द गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीत जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येत नसून, डेल्टा प्लसचा धोका वाढतोय अस सांगत, नागरिकांनी अधिक जबाबदारीने वागलं पाहिजे असं सांगितलं.

मग दोनच दिवसांत गृहमंत्र्यांना आपण काय बोललो याचा विसर पडला की हे नियम त्यांच्यासाठी नाहीत, अशी चर्चा आहे.

Advertisement

शरद पवारांना जमतं ते वळसे पाटलांना का नाही ?

एकीकडे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्या कार्यक्रमात कोरोना नियम फाट्यावर मारले जात आहेत, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मात्र गर्दी होऊ नये, यासाठी मोठी काळजी घेताना दिसतात.

शनिवारी संध्याकाळी शरद पवारांनी पक्षाच्या नव्या कार्यालयाला भेट दिली. काही जणांचा पक्ष प्रवेशही या वेळी करण्यात आला; मात्र अजिबात गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेत त्या प्रकारच्या सूचना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या होता.

गृहमंत्री वळसे पाटीलही तेव्हा सोबत होते. जे शरद पवारांना जमतं ते वळसे पाटलांना का जमलं नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement