Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

रक्षकच झाले भक्षक ! पोलीस अधिकाऱ्यानेच केला तरुणीवर बलात्कार

कोथरुडमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यानेच 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी, बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात आरोपी पीएसआयविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. प्रवीण नागेश जर्दे असे आरोपी पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून तो पीएसआय पदावर कार्यरत आहेत.

सध्या, येरवाडा पोलीस वाहतूक विभागात पोलीस उपनिरीक्षकपदी तो कार्यरत आहे. आरोपीने लग्नाचे अमिष दाखवून पीडिताला पुणे आणि परिसरातील विविध ठिकाणी नेत तिच्यार वारंवार बलात्कार केला.

Advertisement

तसेच, आपले पहिले लग्न झाल्याचेही आरोपीने लपवून ठेवल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. पीडिताने लग्नाची मागणी केल्यावर तिला टाळाटाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

आरोपी जर्दे हा यापूर्वी 2018 मध्ये कोथरुड पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्यावेळी, एका प्रकरणात तपास करताना आरोपीच्या बहिणीसोबत जर्देची ओळख झाली.

त्यानंतर, आपलं पहिलं लग्न झाल्याचं लपवून ठेवत आरोपीने तिच्याशी जवळीस वाढवली. तसेच, लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने बलात्कार केला.

Advertisement
Leave a comment