लेकीला भेटायला हा गुंड आला, जीव गमावून बसला

लेकीला भेटायला आलेल्या कुख्यात गुंड राहुल उर्फ पप्पू वाडेकर याचा डोक्यात दगड घालून निर्घूण खून करण्यात आला. या खुनामुळे राजगुरूनगर शहरात टोळीयुद्धाचा भडका पुन्हा उडण्याची शक्या आहे.

पूर्ववैमनस्यातून हत्या

राहुल वाडेकर हा गेल्या काही दिवसांपासून तडीपार होता. रविवारी मध्यरात्री तो राजगुरुनगर शहरात प्रवेश करताना मध्यरात्रीच्या सुमारास त्याची हत्या करण्यात आली.

मागील काही दिवसात गुंड पप्पू वाडेकर याने पुणे जिल्ह्यात दहशत पसरवली होती. राजगुरूनगरमधील एका हॉटेलमध्ये खंडणी मागून खुनी हल्ला केल्याचा राग होता.

या रागातून गुंड पप्पू वाडेकर याचा मालक मिलिंद जगदाळे व त्याच्या अन्य पाच साथीदारांनी पप्पूचा काटा काढल्याचा अंदाज पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांनी वर्तवला आहे.

विविध गुन्हे दाखल

विविध प्रकारच्या गुन्ह्यात सहभागी असलेला तडीपार गुंड पप्पू कल्याण वाडेकर अवघ्या 28 वर्षाचा होता. पप्पू वाडेकरवर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि खंडणी असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

टोळीचा म्होरक्या म्हणून त्याच्या विरोधात पोलिसांनी शिफारस केल्यानुसार त्याला खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले होते.

रविवारी तो आपल्या लहान मुलीला भेटायला राजगुरूनगर परिसरात आला होता. संशयित आरोपी व त्याच्यात दोनदा जोरदार भांडणे झाली होती; मात्र काही दिवसांपूर्वी समेट झाल्याची चर्चा होती; पण रविवारी त्याला राजगुरूनगर येथील पाबळ रोड परिसरात आरोपींनी गाठले व ठार केले.