पुणे : राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील नेत्यांमध्ये कशावरून ना कशावरून सारखी कुरबुरी सुरु असते. शिवसेना (Shivsena) उपनेते आणि माजी मंत्री सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.

शिवसेना मेळाव्याचे वेल्हा (Velha) तालुक्यात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी सचिन अहिर बोलत होते.

यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार मध्ये बिघाडी करण्याचा प्रयत्न केला तर याद राखा असा इशारा विरोधकांना दिला आहे.

Advertisement

पुणे जिल्हापरिषद (Pune Jilha Parishad) आणि पंचायत समिती निवडणुकीच्या (Panchayat Samiti Election) पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाची मोर्चेबांधणी सुरु आहे.

शिवसेना उपनेते आणि माजी मंत्री सचिन अहिर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे.

यावेळी बोलताना सचिन अहिर म्हणाले की, सरकार हे महाविकास आघाडीचंयं, आघाडीत जर कोणी बिघाडी करत असेलं तर याद राखा राज्याचे मुख्यमंत्री हे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेयत असा इशारा सचिन अहिर यांनी दिला आहे.

Advertisement

कार्यक्रमात बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तालुक्यात आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या भूमिपूजन आणि उदघाट्नच्या वेळी पोस्टरवर उद्धव ठाकरेंच नावे आणि फोटो येत नसल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.