मुंबई : काँग्रेसचे (Congress) नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्यातील सरकारबद्दल खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार मध्ये काही बिनसलं आहे का ? हे पाहणे म्हणत्वाचे आहे.

भाजपचे (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी १० मार्चनंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल असा दावा केला होता त्यामुळे १० मार्चनंतर राज्यात काय होणार अशा चर्चा रंगल्या आहेत.

पंतप्रधानाच्या महाराष्ट्राबद्दलच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने भाजप नेत्यांच्या घराबाहेर आंदोलने करण्यास सुरुवात केली होती. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर नाना पटोले काँग्रेस कार्यकर्त्यांना घेऊन आंदोलन करणार होते मात्र त्यांना पोलिसांनी अडवले होते.

Advertisement

या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)  नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी काँग्रेसला फाटकारल्याचे दिसले होते. राज्यातील नेत्यांच्या घराबाहेर आंदोलने करणे चुकीचे असल्याचे म्हंटले होते.

यानंतर नाना पटोले यांनी असे म्हंटले आहे की, जे काही सरकार मध्ये सुरु आहे, त्याला दुरुस्त करण्याची वेळ आली असून १० मार्च नंतर सरकार दुरुस्त करतोय असे तर्कवितर्क लावणारे वक्तव्य केले आहे.

नाना पटोले यांनी असे वक्तव्य केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये राजकीय भूकंप येणार का? असे अनेक प्रश्न राज्यातील जनतेला पडले आहेत.

Advertisement

तसेच ५ राज्याच्या निवडणुका असून माझे सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याशी बोलणे झाले आहे असेही काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी म्हंटले आहे.