कोरोना महामारी मुळे अनेक व्यवसायावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे त्यामुळे खूप व्यवसाय हे बंद अवस्थेत आहेत आणि त्यातच उत्पन्नाचे कोणतेच साधन उपलब्ध नाही आपले व्यवसायिक भाडे कसे भरायचे आणि आपला प्रपंच हा देखील कसा प्रकारे चालवायचा हा प्रश्न अनेक व्यवसायिक लोकांना भेडसावत आहे आणि अशाचप्रकारे केशकर्तन करणाऱ्यावर पुर्णत: उपासमारीची वेळ आली असून आपला उदरनिर्वाह करायचा कसा ? असा मोठा केश कर्तन मालक, कामगारांसमोर उपस्थित होत आहे.

अनेक वर्षांपासून हा व्यवसाय आहे अन् पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह यावरच आहे.परंतु, कोरोना महामारीमुळे सर्व व्यवसाय हा बंद झाल्यामुळे आपला चरितार्थ व कुटुंब कसे चालवायचे ? असा प्रश्न निर्माण झाल्याने आम्हाला भाजीविक्री करण्याशिवाय पर्याय उरला नाही, असे मत अनेक सलून व्यवसायिकांनी व्यक्त केले.

Advertisement