महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडीचे वातावरण सध्या सुरू आहे. एका पक्षाने तर चक्क पाठिंबा काढून घेण्याचा इशाराही दिला आहे; मात्र या सर्व अफवा असून सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल,

असेही सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जात असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्व जण झोपेत असतानाच हे सरकार जाईल, असे विधान केले आहे.

केसाने गळा कापण्यासारखा विश्वासघात

Advertisement

देवेंद्र फडणवीस मध्यंतरी असे म्हणाले, झोपेतून उठलो होतो आणि सरकार गेले होते. केसाने गळा कापण्यासारखा विश्वासघात झाला होता. मी त्यावर असे म्हटले, तुम्ही सर्व विचारताय, हे सरकार कधी जाईल.

त्यांना कळणारच नाही… 

असेच सर्व जण झोपेत असताना सरकार जाईल. त्यांना कळणारच नाही सरकार कधी गेले, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले. एका वृत्तवाहिनीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.

Advertisement

कधी आरक्षणच द्यायचे नव्हते…

यांना मराठा समाजाला कधी आरक्षणच द्यायचे नव्हते. १९९५-९९ आणि २०१४-१९ ही वर्षे सोडली तर यांचेच सरकार होते. त्यांनी त्यावेळी का नाही दिले मराठा आरक्षण, असा सवालही त्यांनी केला.

नाही तर लोक यांना मारतील

Advertisement

आता रिव्ह्यू पिटीशन दाखल करतील, नाही तर लोक यांना मारतील; परंतु ते रिव्ह्यू पिटीशन योग्यरीत्या चालवणार नाहीत. केंद्र रिव्ह्यू पिटीशन योग्यरीत्या चालवेल.

आंदोलन करतील, त्याला आमचा पाठिंबा

मराठा समाजाला वर्षानुवर्षे आंदोलन करूनही जे आरक्षण मिळाले नाही, ते देवेंद्र फडणवीसांनी दिले आणि टिकवलेही; परंतु या सरकारला ते टिकवता आले नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जे कोणी आंदोलन करतील, त्याला आमचा पाठिंबा आहे, असेही पाटील म्हणाले.

Advertisement