ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

अधिवेशनात सरकार मांडणार तीन मुख्य प्रस्ताव

महाविकास आघाडी सरकारने या अधिवेशनात तीन महत्त्वाचे प्रस्ताव मांडण्यात ठरविले आहे. विरोधकांनी घेतलेला पवित्रा पाहता हे तीन प्रस्ताव मंजूर होण्यावरून गदारोळ उडण्याची शक्यता आहे.

केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात नवा कृषी कायदा

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला देशपातळीवर मोठा विरोध होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून अधिक काळ राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

मराठा आरक्षणासाठीची केंद्राकडे मागणी

मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा यासाठी एक ठराव मांडला जाणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार संभाजीराजे आणि अन्य मराठा संघटनांकडूनही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला काही पर्याय सुचवले जात आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा यासाठी ठराव मांडला आहे.

इम्पिरिअल डाटा देण्याची मागणी

मराठा आरक्षणासह ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्द्यावरुन राज्य सरकारची डोकेदुखी वाढली आहे. विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षातील ओबीसी नेत्यांनी आरक्षण पूर्ववत होईपर्यंत कुठल्याही निवडणुका होऊ नये, असा पवित्रा घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणासाठी गरजेचा असलेला इम्पेरिकल डाटा केंद्र सरकारने द्यावा अशी मागणी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

तसा एक प्रस्ताव या अधिवेशनात मांडला जाणार आहे. विरोधक मात्र इम्पेरिकल डाटा राज्य सरकारने गोळा करून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी करतात.

एमपीएससी समिती गठीत केली जाणार

स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रकरणावरुन पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर महाविकास आघाडी सरकार चांगलंच अडचणीत आलं आहे.

सरकारच्या नाकर्तेपणामुळेच स्वप्नीलने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केलाय. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वप्नीलच्या आत्महत्येबाबत चर्चा करण्यात आली.

एमपीएससी परीक्षा संदर्भात राज्य सरकार एक समिती गठीत करणार आहे. ही समिती एमपीएससी परीक्षा संदर्भात अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करणार आहे.

 

You might also like
2 li