भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने असे म्हटले आहे की दोन दशकांहून अधिक काळपर्यंत उत्तम कारकीर्द असूनही त्याच्या आयुष्यात नेहमीच दोन गोष्टींची खंत असेल .

2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या तेंडुलकरच्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अजूनही आहे.

सचिनने क्रिकेट डॉट कॉमला सांगितले की, ‘मला दोन गोष्टींची खंत आहे. पहिले म्हणजे सुनील गावस्कर यांच्यासोबत मी कधीही खेळू शकलो नाही. गावस्कर मी मोठा होत असताना माझ्यासाठी बॅटिंगमधील हिरो होते .

Advertisement

त्यांच्याबरोबर एका संघात खेळण्याची संधी न मिळाल्याची खंत नेहमीच असेल . मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी ते निवृत्त झाले होते . ‘

भारतासाठी २०० कसोटी आणि 463 एकदिवसीय सामने खेळणार्‍या तेंडुलकरच्या नावावर ५१ कसोटी शतके आणि ४९ वनडे शतके आहेत. तो म्हणाला, ‘सर विव्हियन रिचर्ड्सविरूद्ध खेळायला न मिळणे जे माझे लहापणीचे हिरो होते ही मला वाटणारी दुसरी खंत आहे. काऊन्टी क्रिकेटमध्ये मला त्यांच्या विरुद्ध खेळायला मिळाले हे माझे भाग्य होते.

Advertisement