ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

बऱ्हाटेंना फाॅलो करणा-यांची कुंडली तपासणी करणार

माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेला अटक केल्यानंतर पोलिसांकडून त्याच्या सोशल मीडियाचा आढावा घेतला जात आहे.

बऱ्हाटे याने फरार असताना फेसबुकवर १२ वेळा व्हिडिओ अपलोड केले आहेत. त्याच्या या पोस्टला लाइक करणे, प्रत्येक व्हिडिओ पाहणे आणि सातत्याने त्याच्या फेसबुक पेजला व्हिजिट करणाऱ्यांची कुंडली तपासण्यात येत आहे.

त्यामध्ये नऊ जणांनी गेल्या काही दिवसांत बऱ्हाटेला सातत्याने ‘फॉलो’ केले. त्यानुसार गुन्हे शाखेकडून संबंधितांची माहिती गोळा केली जात आहे.

पोलिस कोठडी

खंडणी आणि फसवणुकीच्या विविध गुन्ह्यांत अटक करण्यात आलेल्या बऱ्हाटे याला १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. विशेष ‘मोक्का’ न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला.

मयूरच्या कोठडीत वाढ

बऱ्हाटेची पत्नी संगीता (वय ४९, रा. धनकवडी) आणि वकील सुनील अशोक मोरे (४९) यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून, मुलगा मयूर याच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे.

या प्रकरणी सुमंत रंगनाथ देठे (५८, रा. मांजरी बुद्रुक) यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून बऱ्हाटे आणि त्याच्या १३ साथीदारांवर गुन्हा दाखल आहे.

बऱ्हाटेने जून २०१७ ते जून २०२० या कालावधीत जागेच्या व्यवहारात फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. बऱ्हाटे हा एक वर्षाहून फरार होता.

या कालावधीत त्याने ऑनलाइन कुरापती सुरूच ठेवल्या होत्या, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. बचाव पक्षातर्फे अॅड. तुषार चव्हाण यांनी बाजू मांडली.

 

 

You might also like
2 li