पर्यटकांसाठी पर्यटनस्थळं बंद असतानाही पर्यटक सरकार आणि पोलिसांना जुमानत नाहीत. पोलिसांनी रोखले, तर आता पोलिसांवरच हल्ला करण्यापर्यंत पर्यटकांची मजल गेली आहे.

पवार यांचे आदेश धाब्यावर

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पर्यटनस्थळावर कडक अंमलबजावणीचे आदेश पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

आदेशानंतरही पर्यटन स्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळाली. अशातच पुण्यात दारूच्या नशेत चार पर्यटकांनी धुडगूस घातला आहे. या मद्यपींनी दारूच्या नशेत पोलिस चौकीच्या काच फोडल्या आहेत.

Advertisement

चार पर्यटकांना अटक

सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणाऱ्या चार पर्यटकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर मद्याच्या नशेत भरधाव मोटार चालवणे, तसंच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे या गुन्ह्यांखाली धिंगाणा घालणाऱ्या चारही पर्यटकांना पोलिसांनी अटक केली आहे.

ही आहेत त्यांची नावे

गणेश संभाजी साळवे (24), सुनीत संभाजी साळवे (22), नवनाथ संभाजी साळवे (30, रा. नाणेकरवाडी, चाकण-तळेगाव रस्ता, जि. पुणे), रामदास बबन औटे (30, रा. गणेगाव, शिरूर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या पर्यटकांची नावे आहेत.

Advertisement

काय घडलं?

शनिवारी मुंबई पुणे महामार्गावरुन आरोपी वेगानं कार चालवत होते. लोणावळ्यातील एवन चिक्की चौकात त्यांनी कार थांबवून धिंगाणा घातला. दारुच्या नशेत या टोळक्यानं वाहतूक पोलिसांच्या चौकीच्या काचा फोडल्या.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कुमार चौकात या मद्यपींची कार अडवली. कारचालक नवनाथ साळवे दारू पिवून कार चालवल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं.

पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. या वेळी गणेश साळवेनं चौकीची काच फोडल्याचं कबूल केलं.

Advertisement