फसवणूक करण्यासाठी कोण किती खोटे बोलेल, याचा भरवसाच देता येत नाही. कुणी लष्करी अधिकारी असल्याचं सांगतो, कुणी नोकरीचं आमिष दाखवितो. आता तर थेट अमेरिकेत गुप्तचर अधिकारी असल्याचं सांगून गंडा घालण्याचा प्रकार घडला.

उच्च शिक्षित तरुणी फसवणुकीची बळी

अमेरिकन सरकारचा गुप्तचर अधिकारी असल्याचं सांगून साता-याच्या तरुणानं पुण्यातील उच्चशिक्षित तरुणीला तब्बल १० लाखाला गंडा घातला. त्याने भारत, अमेरिका आणि दुबईची आपल्यावर जबाबदारी असल्याची थाप मारली.

हा धक्कादायक प्रकार औंध येथे घडला. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी तात्काळ सूत्रे फिरवत तोतया गुप्तचर अधिका-याला बेड्या ठोकल्या आहेत.

Advertisement

गंडा घालणारा तरुण साता-याचा

अमित चव्हाण (३०, पाटण, सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत धायरी येथील एका २८ वर्षीय तरुणीने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फसवणूक झालेल्या तरुणीनं फॅशन डिझायनिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

संशयित आरोपी अमित हा चाकण परिसरात तिच्या बरोबर राहण्यास होता. एप्रिल २०२१ मध्ये अमित आणि तरुणीची बेटर हाफ या सामाजिक माध्यमावर भेट झाली.

या वेळी त्यानं तिला अमेरिकेतील गुप्तचर विभागातील अधिकारी असल्याचं सांगून त्याच्यावर भारत, दुबई, अमेरिकेची जबाबदारी असून १५४ देश हॅन्डल करत असल्याचं सांगितलं.

Advertisement

भारतात तपासासाठी आल्याची थाप

भारतात तपासासाठी आलो असल्याची थाप मारून त्याने तिला विश्वासात घेतले. त्यानंतर त्यांचे बोलणे सुरूच होते. याच दरम्यान त्याने तिला लग्नाची मागणी घातली. या वेळी आरोपीने त्याची ओळख राहुल राजाराम पाटील अशी सांगितली.

याच दरम्यान दोघे बाणेर येथे भेटले. तेथे त्याने तरुणीला तिचा मोबाईल मागितला. त्याच्यावर विश्वास ठेऊन तिनेही तिचा मोबाईल त्याला दिला. त्याने तिला माझ्यावर आणि तुझ्यावर रॉ (रिसर्च अनालिसीस टीम) नजर असल्याची भीती घातली.

फिर्यादीला भीती दाखवून तरुणीला तिचा लॅपटॉप फॉरमॅट करण्यास सांगितला. विविध कारणं सांगून त्याने तिचे सिमकार्ड, एटीएमकार्डही ताब्यात घेतले.

Advertisement

तिला त्याच्या मिहीर जैन या मित्राचे सुरत, गुजरात येथील टेक्सटाईल कंपनीतून कमी किंमतीत व लवकर मटेरीअल मिळवून देतो असे आमिष दाखविले.

वारंवार तिला रॉची भिती दाखवून त्यांने तिच्या खात्यातून तब्बल ८ लाख ३७ हजार रूपये ट्रान्सफर केले. तसेच तिचा अॅपल कंपनीचा १ लाख २८ हजारांच्या लॅपटॉपचाही अपहार केला.

 

Advertisement