जंगलाचे क्षेत्र कमी झाल्याने बिबटे आता आपले क्षेत्र सोडून थेट मानवी वस्तीत घुसायला लागले आहेत. घाटमाथ्यापासून दोनशे किलोमीटर आता उसाच्या क्षेत्रात त्यांचा वावर वाढला आहे.

भक्ष्याच्या शोधात बिबटे मानवी वस्तीत घुसायला लागले आहेत. असाच एक बिबट्या मानवी वस्तीत घुसला. बंगल्यात त्यानं प्रवेशही केला; परंतु बंगल्याच्या दारातील कुत्र्यानं बिबट्याला पळवून लावलं.

सीसीटीव्ही कॅमे-यात घटना कैद

जुन्नरमध्ये बिबट्याचा मानवी वस्तीतला वावर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आळेफाटा परिसरात शिकारीसाठी एक बिबट्या बंगल्यात घुसला; पण दारात असलेल्या कुत्र्याने बिबट्याला चांगलेच पिटाळून लावले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Advertisement

सामना कुत्र्यानंच जिंकला

आळेफाटा परिसरातील एका बंगल्यातला हा व्हिडिओ आहे. आळेफाटा परिसरात सुरेश गडगे यांची सोसायटी आहे. पुणे नाशिक महमार्गावर धानापुणे सर्व्हिस स्टेशन शेजारी हा बंगला आहे. बंगल्याच्या आवारात रात्रीच्या वेळी एक बिबट्या शिरला होता.

शिकारीच्या शोधात हा बिबट्या बंगल्यात शिरतो; पण आतमध्ये असलेल्या एक कुत्र्यासोबत त्याचा सामना होतो. कुत्रा बिबट्यावर जोरजोरात भुंकू लागतो. कुत्र्याचा प्रतिकार पाहून बिबट्याही मागे हटतो आणि भिंतीवरुन उडी टाकून पळून जातो.

Advertisement