Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

लोको पायलट यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले ज्येष्ठ नागरिकाचे प्राण

कल्याण स्थानकातून मुंबई-वाराणसी रेल्वे नुकतीच सुरू झाली. याच वेळी ज्य़ेष्ठ नागरिक रेल्वे खाली अडकल्याचं दिसून आलं.

लोको पायलट एस. के. प्रधान आणि सहाय्यक लोको पायलट रविशंकर जी. यांना कळताच त्यांनी तातडीने इमर्जन्सी ब्रेक्स लावले. त्यामुळे या ज्येष्ठ नागरिकाचे प्राण वाचू शकले.

थरारक घटना

वाराणसी ही लांबपल्याची रेल्वेगाडी कल्याण रेल्वे स्थानकातून सुटतानाच एक ज्येष्ठ नागरिक रेल्वे क्रॉसिंगच्या नादात रेल्वेखाली अडकून पडला.

Advertisement

ही बाब लक्षात येताच लोको पायलट्सनं सुरू झालेल्या रेल्वेला इमर्जन्सी ब्रेक्स लावल्यानं संभाव्य धोका टळला आणि संबंधित व्यक्तीला सुखरुप बाहेर काढण्यात आलं.

या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

काय घडले ?

रेल्वे प्रशासनाने या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं, की रुळांवर उभी असलेली रेल्वे क्रॉस करण्याच्या प्रयत्नात वृद्धाचा पाय अडकला आणि पडले. त्याचक्षणी रेल्वे सुरू झाली.

Advertisement

त्यामुळे ते रेल्वे आणि रुळ यांच्यामध्ये अडकून पडले; पण लोको पायलट्सच्या प्रसंगवधानामुळं संभाव्य धोका टळला. या नागरिकाचे नाव अद्याप कळू शकलेले नाही.

रूळ ओलांडणे धोकादायक

या घटनेचा व्हिडिओ समोर आणत रेल्वे रुळ ओलांडणं किती धोकादायक आहे हे सांगण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

बेकायदा पद्धतीने रेल्वे रुळ ओलांडू नका हे जीवघेणं ठरू शकतं असा इशाराही या वेळी रेल्वेचे चीफ पर्मनंट वे इन्स्पेक्टर संतोष कुमार यांनी दिला.

Advertisement

तसेच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कन्सल यांनी प्रसंगावधान दाखवल्याबद्दल लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट तसेच निरीक्षकांना दोन हजारांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

Leave a comment