कला दिग्दर्शक राजू सापते आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्यातील फरार मुख्य आरोपीच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

अटकपूर्व जामीन मिळवण्याचा होता प्रयत्न

प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना यश आले आहे. राकेश मौर्य असं या आरोपीचं नाव आहे.

राजू सापते यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला कीज हॉटेलमधून अटक केली.

Advertisement

अकटपूर्व जामीन मिळवण्यासाठी राकेश मौर्य वकिलाला भेटण्यासाठी पिंपरीत आला होता. तेव्हा वाकड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. राकेश मौर्य हा लेबर युनियनचा अध्यक्ष आहे.

काय म्हणाले होते साप्ते ?

दरम्यान, राजू सापते यांनी 2 जुलैच्या रात्री आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता.

काम करत असताना एका युनियनच्या पदाधिकारी त्रास देत असल्याचे त्यांनी या व्हिडिओत म्हटले आहे. त्यांनी पुण्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली.

Advertisement

आत्महत्येपूर्वी त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला, यामध्ये त्यांनी आपल्या आत्महत्येचे कारण आणि आपल्या व्यथा सांगितल्या आहेत.

व्हिडिओ पोस्ट

आत्महत्येपूर्वी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये राजू म्हणतात, ‘नमस्कार मी राजेश मारुती सापते. मी एक आर्ट डिरेक्टर आहे. मी आता कोणतीही नशा केलेली नाही. पूर्ण विचाराअंती मी आता हा निर्णय घेत आहे.

कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. त्यातली ही गोष्ट आहे, की राकेश मौर्या जे लेबर युनियनमधून आहेत, ते मला खूप त्रास देत आहेत. माझं कुठच्याही प्रकारचं पेमेंट तिथे थकीत नाही.

Advertisement

सगळं पेमेंट रेग्युलरली दिलेलं आहे. माझी कुठलीही कम्प्लेंट तिथे नाही. राकेश मौर्या युनियनमधील काही लेबर लोकांना मुद्दाम फोन करून त्यांच्याकडून ते वदवून घेत आहेत की राजू सापतेने पैसे दिलेले नाहीत.’