संगणक प्रणालीत दिलेल्या मुदतीत दहावीच्या काही विद्यार्थ्यांचे गुण भरले नाहीत, विद्यार्थीनिहाय गुण निश्चित के ले नाहीत, विद्यार्थीनिहाय गुण भरून निश्चित केल्यावरही काही त्रुटी राहिल्या आहेत.

या त्रुटींची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत विभागीय मंडळांना, गुण भरताना अडचणी आलेल्या शाळांनी ५ ते ९ जुलैदरम्यान विभागीय मंडळाशी संपर्क साधण्याच्या सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत.

राज्यात दहावीच्या मूल्यमापन प्रक्रियेमध्ये शाळांना उपलब्ध करून दिलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे विद्यार्थीनिहाय गुणांची नोंदणी करताना शाळास्तरावर काही त्रुटी राहिल्याचे राज्य मंडळाच्या निदर्शनास आले आहे.राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

Advertisement

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाद्वारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी मूल्यमापन पद्धती निश्चित करण्यात आली आहे, या प्रक्रियेसाठी शिक्षकांचे प्रशिक्षणही घेण्यात आले आहे.

राज्य मंडळाकडून विषयनिहाय गुण भरण्यासाठी संगणकीय प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मात्र संगणक प्रणालीत दिलेल्या मुदतीत काही विद्यार्थ्यांचे गुण भरले नाहीत, विद्यार्थीनिहाय गुण निश्चित के ले नाहीत, विद्यार्थीनिहाय गुण भरून निश्चित के ल्यावरही काही त्रुटी राहिल्या, एखाद्या विद्यार्थ्यांचे एखाद्या विषयाचे गुण, श्रेणी भरली नाही, पाचवी ते नववीची टक्के वारी भरली नाही, परीक्षा अर्ज उशिरा भरल्याने बैठक क्रमांक मिळाला नाही आणि त्यामुळे प्रणालीत गुण भरता आले नाहीत, परीक्षा अर्ज भरताना परीक्षार्थी प्रकार (नियमित, पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी) चुकल्याने प्रणालीत गुण भरता आले नाहीत, अशा प्रकारच्या त्रुटी शाळास्तरावर राहिल्याचे निदर्शनास आले आहे.

Advertisement

या त्रुटी विभागीय मंडळांच्या माध्यमातून दूर करण्यात येणार आहेत. त्या संदर्भातील सूचना शाळा, विभागीय मंडळांना देण्यात आल्या आहेत.