राजगुरूनगर :-  घरातून सुनेला हाकलून देण्यात सासवांचा मोठा सहभाग असतो; परंतु राजगुरूनगर इथं वेगळंच घडलं. ‘माझ्या घरात कशी काय राहते, तेच बघतो,’ असं म्हणत सुनेवर चाकूनं वार करणाऱ्या सासऱ्यानं भरधाव डंपरखाली उडी मारून आत्महत्या केली.

किरकोळ कारणावरून वाद

पुरुषोत्तम दगडू येवले (वय-75) असं आत्महत्या केलेल्या सासऱ्याचं नाव आहे, तर राधिका मोरेश्वर येवले (वय-35) असं चाकूहल्ला झालेल्या सुनेचं नाव आहे. दोघंही खेड तालुक्यातील वाकी गावातील संतोषनगर परिसरात राहतात.

किरकोळ कारणावरून झालेल्या वादावादीनंतर सासरे पुरुषोत्तम यांनी रागाच्या भरात आपल्या सुनेवर चाकूहल्ला केला आहे. या हल्ल्यात सून गंभीर जखमी झाल्याचं पाहून सासऱ्यांनी दुचाकी घेऊन पलायन केलं होतं.

Advertisement

सासरा, सुनेवर एकाच ठिकाणी उपचार

चाकूहल्ल्यानंतर संतोषनगरमधील काही लोकांनी सून राधिका यांना तातडीनं चाकण येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं,

तर दुसरीकडे सासरे पुरुषोत्तम यांना बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल केलं. सून आणि सासऱ्यावर चाकण येथील क्रिटीकेअर याठिकाणी उपचार सुरू होते.

राधिकावर उपचार

सासरे पुरुषोत्तम येवले यांनी अखेरचा श्वास घेतला आहे, तर सून राधिका यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत. राधिका यांची प्रकृत्तीदेखील चिंताजनक आहे.

Advertisement