ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

‘नियो मेट्रो’ प्रकल्पास केंद्र सरकारकडून निधी मिळणार

पुण्यात प्रस्तावित असलेल्या एचसीएमटीआर मार्गासाठी ‘नियो मेट्रो’ केल्यास मेट्रोच्या खर्चाच्या २५ टक्के रक्कमेत ती पूर्ण होते.

त्यामुळे या योजनेचा प्रस्ताव पाठवा. केंद्र सरकार त्यासाठी निधी देईल, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

‘पुण्य दशम’ सेवा सुरू

पुणे महापालिकेतर्फे मध्यवर्ती भागातील वाहतुकीसाठी ‘पुण्य दशम’ या बससेवेचे लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते महात्मा फुले मंडई येथे झाले.

या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, भापजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सुनीता वाडेकर आदी उपस्थित होते.

एकाच तिकिटावर प्रवास

मेट्रो आणि पीएमपी बससेवा इंटिग्रेटेड होणार आहे. त्यामुळे एकाच तिकीटात कोणत्याही पद्धतीने प्रवास करता येईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुलभ असेल, तर नागरिकांकडून त्यास प्रतिसाद मिळतो.

उच्च द्रुतगती उन्नत मार्गावर (एचसीएमटीआर) नियो मेट्रोचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविल्यास त्यासाठी निधी उपलब्ध होईल, असं त्यांनी सांगितलं.

सार्वजनिक वाहतुकीची सवय लावा

फडणवीस म्हणाले, की दहा रुपयात कुठंही प्रवास करता येईल ही योजना चांगली कल्प आहे. यामुळं प्रदूषण, वाहतूक कोंडी कमी होईल.

नागरिकांना बसची माहिती मिळावी, यासाठी अॅप सुरू करावे. देशात सर्वाधिक इलेक्ट्रीक बसेस पुण्यात वापरल्या जातात. चांगल्या सुविधा देऊन लोकांना सार्वजनिक वाहतुकीची सवय लावली पाहिजे.

 

You might also like
2 li