Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

पुणे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या झाली कमी; इतकी आहे कोरोनाबाधितांची संख्या

कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसून येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात पण मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या आढळून येत होती.

पण आता रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. पुणे शहरात पण तब्बल २ महिन्यांनी कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील निर्बंध पण काही ठिकाणी उठवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पुणे शहरात गर्दी पण लॉकडाऊन नंतर वाढत असल्याचे दिसून आले आहे.

पुणे शहरात कोरोना रुग्णसंख्या जरी कमी होत असली तरी काही प्रमाणात लॉकडाऊन उठल्यानंतर गर्दी वाढत असल्याचे दिसून आले आहे. सोमवार दिनांक ७ जूनला पुण्यात ८३७ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरात १७७, पिंपरी चिंचवड मध्ये २०६,

Advertisement

जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ३८४, नगरपालिका क्षेत्रात ६८ आणि कॅंटोन्मेंट झोन मध्ये २ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात सध्या १७,७२० कोरोना रुग्ण असल्याचे सांगण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात आता पर्यंत १०,२४, २७७ कोरोना रुग्णसंख्या झाल्याचे सांगण्यात आले आहे.

कोरोना रुग्णांना डिस्चार्ज पण मोठ्या प्रमाणावर देण्यात येत असून ५१४ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज पण देण्यात आला आहे. पुणे शहरात सोमवारी १७७ कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आढळून आली आहे. पुणे शहरातील एकूण रुग्णसंख्या ४ लाख ७२ हजार ७३१ झाली असल्याचे महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Advertisement
Leave a comment