पुण्यात रुग्णसंख्या दहा हजारांवर

टाळेबंदीचे निर्बंध अधिक कडक केल्यानंतरही पुणे शहर आणि जिल्ह्यांत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. दैनंदिन दहा हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत.

सक्रिय रुग्णसंख्येतही वाढ

रुग्णसंख्या घटत असल्याचे चित्र दिसत असताना अचानक ग्रामीण भागासह शहरातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे सक्रिय रुग्णसंख्या वाढली आहे. शहरात अडीच हजारांच्या आत असणारी संख्या २,७००, तर जिल्ह्यातील साडेनऊ हजारांपर्यंत असणारी सक्रिय रुग्णसंख्या १० हजारांपुढे गेली आहे.

कोरोनामुक्तांच्या संख्येत घट

पुणे शहरात २,७०४, पिंपरीत १,४६० आणि ग्रामीण भागात ६,०९७ असे दहा हजार २६१ एवढे सक्रिय रुग्ण आढळले आहेत. पुणे शहरात सहा हजार ४८४ एवढ्या चाचण्या झाल्या. त्यापैकी २८६ जण बाधित झाले आहेत.

पिंपरीत २६५, तर ग्रामीण भागात ६२९ रुग्ण आढळल्याने १,१८० जणांना संसर्ग झाला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या साडेदहा लाखांपुढे गेली आहे. शहरात १३३, पिंपरीत १७१ आणि ग्रामीण भागात ५६६ असे ८७० जण आजारातून बरे झाले आहेत. बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या घटली आहे.

गेल्या २४ तासांत पुण्यात सहा, पिंपरीत दोन आणि ग्रामीण भागात नऊ अशा १७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या १७ हजार ९३१ एवढी झाली आहे.