Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

रुग्णसंख्या अडीच हजारांच्या खाली

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. आता पुणेकरांना दिलासा मिळाला असून शहरातील रुग्णसंख्या अडीच हजारांच्या आत, तर जिल्ह्यातील रुग्णसंख्येत दहा हजाराच्या आत आहे.

काळजी घेण्याचे आवाहन

रुग्णसंख्या घटत असली, तरी नागरिकांनी काळजी घेण्याचे तसेच गर्दी न करण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. पुणे शहरात सक्रिय रुग्ण २५५९, पिंपरीत ११७६; तसेच ग्रामीण भागात सहा हजारापर्यंत सक्रिय रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात एकूण ९७३६ सक्रिय रुग्ण आढळल्याने ही संख्या आता घटली आहे.

दहा लाखांहून अधिक रुग्ण बरे

पुण्यात २११, पिंपरीत २२०; तसेच ग्रामीण भागात ७७४ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात एकूण १२०५ नवीन रुग्ण आढळले आहेत. शहरात ३०२ तर पिंपरीत २३५ रुग्ण कोरोनामुक्त आढळले आहेत.

Advertisement

ग्रामीण भागात १०६८ रुग्ण; तर एकूण जिल्ह्यात १६०५ रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत दहा लाख ११ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

गेल्या चोवीस तासांत पुण्यात आठ, पिंपरीत चार; तर ग्रामीण भागात सहा अशा १८ रुग्णांना करोनामुळे प्राण गमवावे लागले.

 

Advertisement
Leave a comment