ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

कैद्यांपुढं तुरूंग अथवा शहर सोडण्याचा पर्याय

पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाईची मोहीम उघडली आहे. त्यातूनच आता गुन्हेगारांसाठी येरवडा तुरुंग अथवा शहर सोडा, ही मोहीम हाती घेतली असून, प्रतिबंधात्मक कारवाईचा सपाटा लावला आहे.

३९ टोळ्यांविरोधात मोक्कांतर्गत कारवाई

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यांपासून ३९ टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार ३००हून अधिक गुन्हेगारांवर कारवाई केली आहे, तर गेल्या नऊ महिन्यांपासून दर महिन्याला किमान १७ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई झाली आहे. झोपडपट्टीतील ‘दादां’वर कारवाईचे हत्यार उगारण्यात आले आहे.

गुन्हेगारांवरील कारवाई समाजमाध्यमांत

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी ‘येरवडा जेल अथवा शहर सोडा’ ही व्यापक मोहीम हाती घेतली आहे.

पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या गुन्हेगारांवरील कारवाईची माहितीही त्यांच्याकडून दररोज ट्विटरवर अपलोड करण्यात येत असून, गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून करण्यात आलेल्या कारवाईचा विशेष उल्लेख त्यात करण्यात आला आहे.

शहरात नव्याने उदयाला येणाऱ्या ‘रायझिंग गुन्हेगारां’ची माहिती अपडेट करण्यात आली आहे. आरोपींनी शहरातून पळ काढल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

नागरिकांच्या सूचनांची अंमलबजावणी

शहरात गेल्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या काळात ‘एमपीडीए’नुसार केवळ चार कारवाया करण्यात आल्या होत्या. सप्टेंबरपासून आजपर्यंत २४ गुन्हेगारांना ‘एमपीडीए’नुसार स्थानबद्ध करण्यात आले आहे.

गेल्या चार वर्षांत सर्वाधिक गुन्हेगारांवर गेल्या नऊ महिन्यांत ‘एमपीडीए’नुसार स्थानबद्ध करण्यात आल्याचा दावा पोलिसांच्या ‘ट्विटर’ अकाउंटवरून करण्यात आला आहे.

नागरिकांकडून आलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षातून विशेष मोहीम राबवली असून त्यासाठी पोलिस ठाण्यांच्या पातळीवर सूचना देण्यात आल्या आहेत.

You might also like
2 li