Pune Crime News : आपल्या समाजात अशा अनेक घटना घडतं असतात ज्या काळीज पिळवटून टाकतात. यातील काही घटना या विकृत मानसिकतेतुन घडतं असतात.
दरम्यान, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या पुण्यातून एक खळबळ जनक बातमी समोर येत आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरात विकृत मानसिकतेतुन एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या गुप्तांगावर चक्क कुलूप लावले असल्याचे धक्कादायक अन अतिशय संतापजनक असे प्रकरण समोर आले आहे.
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने हे धक्कादायक कृत्य केले असल्याचे उघडकीस झाले आहे. या अमानवीय घटनेमुळे पिंपरी चिंचवड परिसरात एकच खळबळ माजली आहे.
दरम्यान या राक्षसी कृत्याची पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार केली असून यानुसार सदर आरोपी विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच सदर आरोपीला गजाआड देखील करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील हे दाम्पत्य कामानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्याला आले आहे.
आरोपी हा वॉचमनचे काम करतो आणि सदर पीडित महिला ही हाऊसवाईफ आहे. या दाम्पत्यामध्ये नेहमीच वादविवाद होत असत. आरोपी आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घेत असत. दरम्यान याच संशयापोटी 11 मे ला कामावरून रात्री घरी परतल्यानंतर आरोपीने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली.
एवढेच नाही तर या निर्दयी आरोपीने ब्लेडच्या साह्याने पत्नीच्या गुप्तांगावर वार केलेत. शिवाय चाकूचा धाक दाखवून पत्नीला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. या विकृत इसमाने पत्नीचे हात बांधून तिच्या गुप्तांगावर दोन्ही बाजूने लोखंडी खिळ्याने होल पाडून त्याला कुलूप देखील लावले.
यामुळे, सदर महिलेला मोठी दुखापत झाली असून घटनेनंतर महिलेने पोलीस ठाण्यात आपल्या पती विरोधात तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे पोलिसांनी देखील अशा प्रकारची अमानवीय घटना पहिल्यांदाच घडली असल्याचे म्हटले आहे. दरम्यान पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानंतर ताबडतोब सदर आरोपीला कस्टडीत घेतले आहे.
आरोपीला अटक झाली असून त्याच्या विरोधात आयपीसी च्या वेगवेगळ्या कलमाअन्वये गुन्हा दाखल झालेला आहे. दरम्यान पीडित महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.