मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना पुण्यातील महानगरपालिकेत शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली होती. या प्रकरणाचा चांगलाच वाद पेटला आहे. किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

किरीट सोमय्या यांनी शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत यांच्यावर घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यांनतर संतापलेल्या शिवसैनिकांनी सोमय्या यांना धक्काबुकी केली.

या धक्काबुक्कीमध्ये सोमय्या खाली पडले होते. त्यांनतर भाजप नेत्यांकडून संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात येत आहे. किरीट सोमय्या यांनी माझी हत्या करण्याचा प्लॅन होता असा आरोपही केला आहे.

Advertisement

किरीट सोमय्या म्हणाले की, संजय राऊत आणि त्यांच्या कंपनीला उद्धव ठाकरे सरकारने कोरोनाच्या काळात कंत्राटे दिली. त्याचा घोटाळा बाहेर काढल्यामुळे शिवसैनिकांनी मला मारण्याचा प्रयत्न केला.

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मदतीने संगनमत करून हा कट रचला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

तसेच भाजपचे शिष्टमंडळ अमित शाह (Amit Shaha) यांच्या भेटीला दिल्लीला गेले आहे. गोपाल शेट्टी, गिरीश बापट, खासदार मनोज कोटक, रक्षा खडसे या नेत्यांचा शिष्टमंडळात समावेश आहे.

Advertisement

यावेळी खासदार मनोज कोटक (MP Manoj Kotak) यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हंटले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील मनोज कोटक यांनी केली आहे.