टिकटाॅक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येशी मंत्र्यांचा संबंध जोडला गेल्याने हे प्रकरण चांगलेच गाजले होते; परंतु वानवडी पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांच्या घेतलेल्या जबाबात संबंधित प्रकरणाचा राजकारणाशी कुठलाही संबंध नसल्याचे तसेच तरुणीच्या आत्महत्या घटनेस कोणालाही जबाबदार धरले नसल्याचे म्हटले आहे. हा सर्व प्रकार म्हणजे राजकीय नाट्य असल्याचे त्यांनी जबाबामध्ये नमूद केले आहे.

विनाकारण राजकीय वळण

”पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आपला कोणावरही आरोप नाही, या विषयला विनाकरण राजकीय वळण देण्यात आले.

मुलीच्या आत्महत्यानंतर घडलेला सर्व प्रकार राजकीय नाट्य होते”, असा जबाब मुलीच्या आई-वडिलांनी वानवडी पोलिसांकडे दिला आहे.

Advertisement

काय घडले ?

वानवडीजवळील महमदवाडी येथे 7 फेब्रुवारीला पूजा चव्हाण या तरुणीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन उड़ी मारून आत्महत्या केली.

या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर वानवडी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास ‘जैसे थे’ ठेवण्यात आला होता.

या प्रकरणाच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर वानवडी पोलिसांकडून केवळ तपास सुरू आहे, इतकेच उत्तर मिळत होते.

Advertisement

पोलिस टीकेचे धनी, तरीही भूमिका सावधच

संबंधित प्रकारणावरुन पुणे पोलिसांवर सडकून टीका झाली, त्यानंतरही पोलिसांकडून आत्तापर्यंत केवळ सावध भूमिका घेण्याकडेच कल राहिला आहे.

या प्रकरणाच्या तपासाबाबतही वानवडी पोलिसांकडून कुठलेही ठोस उत्तर दिले जात नाही. विशेषत: या प्रकाणाशी संबंधित कुठलीही माहिती बाहेर पोचणार नाही, यादृष्टीने पोलिस कर्मचाऱ्यांना तंबी देण्यात आली होती.

 

Advertisement