पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याचे राजकारण हे चुकीच्या पद्धतीने चालू असल्याचे अभिनेते (Actor) नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी म्हटले आहे. यावेळी ते पुण्यात (Pune) एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

नाना पाटेकर यांनी राजकीय (Political) आणि विद्वान मंडळी शिवाजी महाराजांच्या विचारांचा फक्त उपयोग करतात असे सांगितले आहे. तसेच महाराजांच्या पुतळ्याचे सध्या राजकारण करत आहेत असे ते म्हणाले आहेत.

तसेच पुढे ते म्हणाले की, महाराजांचे फक्त पुतळे उभा करुन चालणार नाही तर त्यासाठी त्यांची शिकवण आत्मसात करायला हवी. शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना त्यांनी सर्वधर्म समभाव ही भावना ठेऊन त्यांनी रयतेचे राज्य अस्तित्वात आणले होते.

Advertisement

बारापगडी जातीच्या लोकांना एकत्र करुन त्यांनी गुण्यागोविंदाने राहायला शिकवले तिच शिवाजी महाराजांची शिकवण अंमलात आणली तर समजातील सर्व प्रश्न सुटतील अशी भावना त्यांनी या कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली आहे.

त्यासोबतच ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किंवा त्यांच्या विचारांचा जागर प्रत्येकाने घातला पाहिजे. मात्र सध्या परिस्थिती वेगळी आहे.

शहरातून, गावातून ज्यावेळी शिवाजी महाराजांचे पुतळे उभा केले जातात त्यानंतरच आपली खरी जबाबदारी वाढते आणि ती जपणूक आपण केली पाहिजे, असे ते म्हणाले आहेत.

Advertisement