गेला आठवडाभर गाजलेल्या आंबिल ओढ्याच्या झोपड्यांचा प्रश्न आता सुटला आहे. त्यांचे पुनर्वसन करून, त्यांना सदनिका दिल्या जाणार असल्यानं झोपडपट्टीधारकांनी स्वतः होऊन जागा रिक्त करण्याची तयारी दाखविली.

नीलम गोऱ्हे यांचा पुढाकार

दांडेकर पूल येथील आंबिल ओढ्यालगतच्या सर्व्हे. १३५ प्लॉट क्र. २८ मधील ३८ झोपड्यांचा प्रश्न मार्गी लागला.

आंबिल ओढ्यातील बाधित होणाऱ्या झोपडपट्टीमधील पात्र निवासी झोपडीधारकांच्या पुनर्वसनाकरिता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत स्थानिक नगरसेवक, एसआरएचे प्रमुख राजेंद्र निंबाळकर, झोपडपट्टीधारक यांची नुकतीच बैठक झाली.

Advertisement

झोपडीधारकांची गृहनिर्माण संस्था तयार करणार

या बैठकीत सर्व्हे. १३५ प्लॉट क्र. २८ मधील झोपडीधारकांनी त्यांची सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी व पुढील पंधरा दिवसांत त्यांची सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

याचबरोबर, ओढ्यातील बाधित क्षेत्रामध्ये असलेल्या ३८ झोपड्यांविरुध्द न्यायालयाच्या निर्देशानुसार व झोपडपट्टीधारकांच्या संमतीशिवाय पुढील कारवाई करण्यात येणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले, तर आंबिल ओढाबाधित क्षेत्रातील इतर सुमारे ६०० झोपडीधारकांचे पुनर्वसन प्रकल्पातच पुनर्वसन करण्याचे आश्वासन केदार असोसिएटसकडून देण्यात आले.

दरम्यान यावेळी त्या ३८ झोपडपट्टीधारकांनी त्यांच्या नालाबाधित झोपड्या स्वत:हून खाली करून देण्याचेही मान्य केले आहे.

Advertisement